गेल्या वर्षी म्हणजेच 25 डिसेंबर 2016 रोजी कपिलेश्वर रोड येथील नियोजित उड्डाणपुल बांधकाम पूर्ण करून सर्व बेळगाव कराना वापरण्यासाठी खुला करण्यात आला होता.त्यानंतर तेथील स्थानिक शिवप्रेमी व दलित संघटनानी नियोजित उड्डाणपुल चे छत्रपती श्री शिवाजी महराज उड्डाणपुल असे नामकरण करावे ह्यासाठी महा पालिके कडे पाठपुरावा केला होता.त्यावेळी पालिकेने टोलवा टोलवी केली होती त्यामुळे शिवप्रेमीनी नाराजी व्यक्त केली होती.
आता मागील सहा महिन्यापासून शहरात दोन उड्डाणपुल चे काम सुरू आहे आणि त्याच बरोबर त्यांच्या नामांतर चा विषय शहरात पुन्हा एकदा चर्चिला जाऊ लागला होता.त्यामुळे आज महानगर पालिकेत महापौर संज्योत बांदेकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन नियोजित कपिलेश्वर उड्डाण पुल च्या बाजूलाच सुप्रसिद्ध असे दक्षिण काशी म्हणून ख्याती असलेले कपिलेश्वर देवस्थान असल्यामुळे त्या उड्डाणपुल ला कपिलेश्वर उड्डाणपुल असे नामकरण करण्याचा ठराव पास करण्यात आला
त्याचबरोबर जुन्या पी बी रोड येथे होऊ घातलेल्या उड्डाणपुल ला छत्रपती श्री शिवाजी महराज उड्डाणपुल असे नामकरण करण्याचा ठराव पास केला आहे.त्या उड्डाणपुल च्या शेजारीच भूईकोट किल्ला असल्या मुळे छत्रपतींच नाव ह्या पुल ला पूरक अस वाटतय.त्याच प्रमाणे रेल्वे ओवर ब्रिज येथील पुलला जगतज्योती बसवेश्वर महराज यांचे नाव देण्याचा ठराव सुद्दा पास करण्यात आला आहे ह्या निर्णयाने सर्व समाज घटकांना खुश करण्याचा प्रयत्न महानगर पालिकेने केला आहे.ह्या नामांतरामुळे सर्व शिव प्रेमी दलित संघटना आणि बेळगांव करांनी समाधान व्यक्त केल आहे.एकंदरीत बेळगाव मधील शिव प्रेमिंच्या लढ्याला यश आले आहे असेच म्हणावे लागेल.
बातमी सौजन्य-विजय होनगेकर