बेळगाव शहराच्या हद्दीत दोन दिवसात ट्रक चे तीन अपघात पहायला मिळाले. यात दोन मृत्यूही झाले. एपीएमसी रोड, संपिगे रोड, विश्वेश्वरय्या नगर व संगोळ्ळी रायन्ना सर्कल या ठिकाणी झालेले हे अपघात जीवघेणे ठरले आहेत.
या तिन्ही अपघातात अवजड वाहनांचा मुक्त संचार कारणीभूत ठरला आहे. अपघातात कुणाची चूक हे समजले नसले तरी अवजड वाहनांचा संचार कसा काय सुरू आहे याचा विचार करण्याची गरज आहे.
हेल्मेट न घालता प्रवास हे ही प्रमुख कारण आहे. मात्र हेल्मेट तपास करणाऱ्या पोलिसांनी रहदारी नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, नियमित रहदारी नियंत्रणाचे आव्हान पोलीस दलाने पेलावे लागणार आहे.
धर्मवीर संभाजी चौक येथे कधीच पोलीस दिसत नाहीत. अशी केंद्रे विचारात घेऊन तेथे नियमित पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे.
मृत्यू झाला की रेस्ट इन पीस चे संदेश पाठवले की काम झाले असे यापुढे चालणार नाही. एकमेकांकडे बोट करूनही चालणार नाही. आज दुसरा मेला उद्या कोणी आपल्यातलाच दगाऊ शकेल, हे ध्यानात घ्यावे, नाहीतर नुकसान होऊ शकते , याचाही विचार व्हावा.