Monday, January 13, 2025

/

महापौरानंतर आता गटनेत्यांच्या चेंडू ज्येष्ठ नेत्यांच्या कोर्टात

 belgaum

आम्ही कधीही सीमाप्रश्नाचा ठराव मांडण्यास तयार आहोत असे प्रतिज्ञापत्र ज्येष्ठ नेते दीपक दळवी, मालोजी अष्टेकर आणि किरण ठाकूर यांच्याकडे दिले आहे, या नेत्यांनी ठरावाच्या दृष्टीने योग्य वेळ आली की ठराव मांडण्याचा आदेश देण्यात येईल असे सांगितले आहे, त्यामजले हा आदेश आला की पुढील प्रक्रिया होईल असे सांगून मराठी नगरसेवक अर्थात सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांनी चेंडू ज्येष्ठ नेत्यांच्या कोर्टात ढकलला आहे.
उद्या या कौन्सिल ची शेवटची बैठक असताना ठराव मांडणार की नाही? या प्रश्नावर उत्तर न देता तसेच युवा वर्गाची ठराव मांडा ही मागणी लक्षात आणून दिल्यावरही सर्वोच्च न्यायालयीन लढा सुरू आहे. ठराव मांडला तर सत्ता अधिकाऱ्यांच्या हातात जाते आणि जनता पोरकी होते असे उदगार त्यांनी काढले. यावरून सत्ताधारी गटाला ठराव करायचाच नाही हे सुद्धा स्पष्ट झाले आहे.
जातीचे राजकारण करून ज्या विजय मोरे यांना आमदारकीच्या निवडणुकीत पाडवण्यात आले त्यांनी २००५ मध्ये फक्त तीन महिन्यात महापौर पदावर लाथ मारून सीमाप्रश्नाचा ठराव मांडला होता. मात्र सलग चार वर्षे सत्ता भोगून आणि यावेळी सत्ता मिळणार नाही हे सिद्ध असतानाही या सत्ताधारी गटाला सत्तेचा मोह सोडवत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.
महापौर आणि सत्ताधारी गटाने आज रात्रीच्या आत सीमाप्रश्नाचा ठराव मांडण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब न केल्यास त्यांना अस्मितेपेक्षा खुर्चीचा मोह मोठा आहे हेच सिद्ध होणार आहे.

Parab pandhari

ओल्ड पी बी रोड उड्डाण पुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव –

जुन्या पी बी रोड ला ऐतिहासिक संदर्भ म्हणून तिथे जिजामाता चौक आहे ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे त्यामुळे जुन्या पीबी रोड ओव्हर ब्रिज ला छत्रपती शिवाजी महाराजांच नाव तर कपिलेश्वर मंदिर असल्याने उड्डाण पुलास कपिलेश्वर उड्डाण पूल असं नाव देणार असल्याचे देखील परब यांनी स्पष्ट केलं . या शिवाय अनुसूचित जमातीच्या आरक्षणास आपण कोर्टात आवाहन देणारा का या विषयावर देखील त्यांनी मौन बाळगले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.