जळाऊ लाकडं वाहणारा ट्रॅक्टर पलटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरमध्ये बसलेले दोघे जण ठार तर अन्य चार जण जखमी झाल्याची घटना तारिहाळ बडेकोळमठ येथे घडली आहे.रविवारी रात्री दहा च्या दरम्यान हा अपघात घडला आहे.
रमेश मल्लाप्पा कुरंगी वय ६५ आणि यल्लप्पा थोरली वय ६० दोघेही राहणार मास्तमर्डी तालुका बेळगाव अशी अपघातात मयत झालेल्या दोघांची नावे आहेत.
हिरेबागेवाडी पोलीस निरीक्षक एस सी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मास्तमर्डी येथील नागरिक बडेकोळमठ येथे महा शिव रात्री निमित्य होणाऱ्या महा प्रसादाला जळाऊ लाकडं देत असतात.काल रविवारी रात्री जळाऊ लाकडांचा ट्रॅक्टर घेऊन मास्तमर्डी हुन तारिहाळ मार्गे बडेकोळमठ ला जात होते लाकडांना बांधलेली दोरी हुक्कातून सुटून तोल गेल्याने ट्रॅक्टर पलटी झाला त्यात इंजिन मध्ये बसलेल्या मोठी इजा पोचली नाही मात्र ट्रॉलीत लाकडांवर बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला तर अन्य चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.जखमीवर सिव्हिल आणि के एल ई उपचार सुरू आहेत.