मराठा कप २०१८गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.एनव्हिरॉनमेंट पार्क अँड ट्रेनिंग एरिया येथे ही स्पर्धा पार पडली. अत्यंत प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत कर्नल गुरुप्रताप सिंग यांनी विजेतेपद पटकावून मराठा कप २०१८ जिंकला.बी.आर.शिवकुमार यांनी उप विजेतेपद मिळवले.देशातील नामवंत १३२गोल्फपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.प्रशिक्षणार्थी,जवान, अधिकारी,महिला आणि मुलांनी स्पर्धेत भाग घेतला होता.
मराठा लाईट इन्फंट्री ही देशातील जुन्या रेजिमेंटपैकी एक असून बोला शिवाजी महाराज की जय ही त्यांची घोषणा आहे.अनेक युद्धात मराठाच्या जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या लढाऊ बाण्याचे आणि शौर्याचे दर्शन घडवून मराठाला एक सन्मान मिळवून दिला आहे.१७६८ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीची स्थापना झाली असून मराठा रेजिमेंटला अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मराठा डे साजरा करण्यात येत असून त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
आज भारतीय लष्करातील सर्वीत्तम रेजिमेंट पैकी एक असणाऱ्या *मराठा लाइट इन्फंट्री* ला *२५० वर्ष* पूर्ण होत आहे.
? *मराठा लाइट इन्फंट्री*?
स्थापना- *४ फेब्रुवारी १७६८*
रेजिमेंटचे मुख्यालय- *बेळगाव*
ब्रीद वाक्य- *कर्तव्य,सन्मान,साहस*
युद्ध घोषणा- *बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय.*