Monday, January 13, 2025

/

मध्यवर्तीने २५ फेब्रुवारीच्या आत निवडणुकीची योजना जाहीर करावी -युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठराव

 belgaum

आगामी निवडणुकी पूर्वी बेकी असलेल्या सर्व घटक समित्यांनी आपापले उमेदवार न ठरवता २५ फेब्रुवारीच्या आता नेते आणि कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घ्यावी आणि निवडणुकी बाबत आपलाही भूमिका मध्यवर्तीने स्पष्ट करावी असा ठराव मांडण्यात आला.

युवा कार्यकर्त्यांच्या वतीने रविवारी मराठा मंदिरात झालेल्या बैठकीत एकीचा सूर आवळला. मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाईक या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रित झालेल्या युवकांनी समितीच्या एकीसाठी बैठक घेतली. बैठकीत कुणीही नेता नसून मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर कुणाही एका गटाला पूरक अशी भूमिका घेऊन एकी करू असा ठाम निर्धार करण्यात आला. बेळगाव सह परिसर आणि खेड्यातून देखील बैठकीत युवक कार्यकर्त्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता.

बैठकीत कुणीही नेता नसल्याने मराठी जनता जी पेटून उठली आहे त्याच्या मागील कारण म्हणजे जे चार पिढ्यांचे नुकसान सीमा प्रश्नासाठी झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी बैठक ही नेत्यासाठी नाही तर मराठी जनतेवर झालेल्या अन्यायाची आग लोकात दिसून आली. आगामी निवडणुकी अगोदर नेत्यांनी स्वतःच्या भ्रमात न राहता जनतेचं हित ओळखून एकी साठी प्रयत्न करावेत असा सूर मांडण्यात आला.

mes

सर्व घटक समित्या बरखास्त करून त्या त्या घटक समित्यांची नव्याने बांधणी करा घटक समित्यांच्या अध्यक्षांची वर्णी मध्यवर्ती समितीत लावून युवकांना मध्यवर्ती स्थान द्या आणि सर्व समावेशक घटक समित्या नेमून जनतेतून आगामी विधान सभेचे उमेदवार निवडा अशी मागणी जेष्ठ कार्यकर्ते अरुण कानूरकर सह अनेक कार्यकर्त्यांनी मांडली घटक समित्यांचे उमेदवारांचा फिक्सिंग झालेले आहे त्यामुळे एकी करणाऱ्यांनी पदरी पालथ्या घागरीवर पाणी असच यश पडेल यासाठी नेत्यांना वठणीवर आणायची गरज आहे.

निवडणुकीत जातीचं राजकारण येत आहे त्यामुळे समितीने देखील मराठी भाषिक असलेल्या इतर जाती धर्मियांना घटक समित्यातून स्थान द्यावे फक्त मराठा समाज अशी प्रतिमा होऊ नये अशी मागणी दैविक हळदणकर याने केली तर निवडणुकी पूर्वी मोहल्ला कमिटी बूथ कमिट्या नेमाव्यात सहावा असलेला यमकनमर्डी मतदार संघात देखील ५० हजार हुन अधिक मराठी भाषिक असताना का उमेदवार डायल जात नाही असा प्रश्न उपस्थित केला.

समिती संघटना मोठी आहे कुणी व्यक्ती मोठी नसून जो पर्यंत एकी होत नाही तोवर कोणत्याही गटाच्या नेत्यांना गावात प्रवेश देऊ नका सगळे मिळून काम केल्यासच विजय आहे असे मत भागोजी पाटील यांनी व्यक्त केले. सीमा भागातील सर्व मराठी वृत्त पत्रांनी अगोदर एक व्हावं आणि एकी करणाऱ्यानी ९० टक्के जनता कुना सोबत आहे त्यांना सहकार्य करावं असे मत नितीन खन्नूकर यांनी मांडलं. सीमा प्रश्न हा केवळ नेत्यांचा झालाय हे चित्र बदलायला हवं समित्या बरखास्त करून युवकांच्या हाती नेतृत्व द्या आगामी विधान सभा निवडणुकीत उमेदवार हे नवीन असले पाहिजेत अशी मागणी चेतन जुटेकर यांनी केली . दिपक हळदणकर श्रीकांत मांडेकर,,मारुती लाड, ,मोतेश बार्देशकर,अनंत किल्लेकर सुधीर नेसरीकर, संदीप खन्नूकर श्रीकांत कदम ,विनायक गुंजटकर ,विनायक पाटील,सुधीर नेसरीकर नारायण कंणबरकर आदींनी आपले विचार मांडले . शेवटी एकी साठी झटणारे कार्यकर्ते गोडसे याना मौन पाळून श्रद्धांजली देखील वाहण्यात आली .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.