Sunday, November 17, 2024

/

गोकाक धबधब्यात उडी टाकून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्त्या

 belgaum

गोकाक येथील धबधब्यात उडी टाकून बेळगावातील वृद्ध दाम्पत्याने आत्महत्त्या केली असल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. सुरेश सहदेव औन्धकर वय ६६ ,पत्नी सुमित्रा सुरेश औन्धकर वय ६० दोघेहीसध्या रा. काकतीवेस बेळगाव अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हे दाम्पत्य शनिवारी रात्री ट्रेन नी गोकाकला गेले होते रात्रीच दोघांनी मिळून एकत्रित रित्या धबधब्यात उडी टाकून आत्महत्त्या केली आहे.धबधब्यात असल्याने उडी टाकताच दोघांचा मृत्यु झाला आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्ये मागचे नेमके कारण मात्र समजू शकलं नाही.

सुरेश औन्धकर हे मूळचे कोल्हापूर जवळील रुकडी गावचे होते त्यांनी गोकाक फॉल्स मध्ये काही वर्षे नोकरी देखील केली होती आता काही वर्षा पासून बेळगावात काकतीवेस येथील भाड्याच्या घरात राहत होते. खडे बाजार येथील बॉम्बे बाजार मध्ये मॅनेजर म्हणून काम पाहत होते आणि नामदेव देवकी समाजाचे संचालक म्हणून देखील कार्य करत होते . त्यांच्या पश्च्यात दोन विवाहित मुली असून एक बेळगावलाच असते सोमवारी सकाळी ११ वाजता कोल्हापूर जवळील रुकडी गावात त्यांच्यावर अंतिम संस्कार केला जाणार आहे.गोकाक पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.