?मेष-हा सप्ताह आपणाला मिश्रफळदायी राहील करियरच्या दृष्टीने शुभ असा राहील नोकरीच्या शोधात असणाऱ्याना नौकरी चे योग येतील आपली कामे मार्गी लागतील तयामुळे मन प्रसन्न राहील सरकारी कामात यश येईल विद्यार्थी वर्गाला परीक्षेत यश मिळेल व्यापारी वर्गाला नवीन व्यवसाय सुरू करण्यास अनुकूल काल आहे.
?वृषभ -आठवड्याच्या उत्तरार्धात काही समस्या येतील तरी हा सप्ताह बरा राहील आहारावर लक्ष ठेवा या काळात पोटाच्या तक्रारी जाणवतील.या काळात आपण कामाचा आळस कराल कामे टाळण्याचा प्रयत्न कराल. तयामुळे नुकसान होईल .या गोष्टींवर नियंत्रण ठेवा. शारीरिक दृष्ट्याही असमर्थ राहाल.महिलांना याकाळात खरेदीचे योग येतील.व्यवसायिक वर्गाला कामानिमित्त प्रवासाचे योग येतील.
?मिथुन-हा सप्ताह आपणास शुभ राहील मागच्या सप्ताहात थांबलेली कामे मार्गी लागतील अनेक समस्या सुटतील. नौकरिपेशा लोकांना बढतीचे योग येतील.व्यापारीवर्गाने लक्ष पूर्वक काम करावे अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे मुलांनी अभ्यासा कडे लक्ष द्यावे.
?कर्क-मागच्या सप्ताह पेक्षा या काळात प्रतिकूल परिस्थितीत राहील तब्येती विषयी तक्रारी जाणवतील तसेच या काळात वाहन चालवताना काळजी घ्यावि आहे त्या परिस्थितीत बदल करू नये. काळ अनुकूल नाही या काळात कुठलीही गुंतवणूक करू नका सरकारी कामात अडथळे येतील. संयमाने राहा. महिलांनी कुटूंबाची जबाबदारी नीट सांभाळावी.प्रवास होईल.
?सिंह-हा सप्ताह आपणास लाभदायी राहील .घर वाहन खरेदीविक्रीचे योग येतील. पूर्वी केलेली गुंतवणूक चा लाभ आता होईल.पूर्वी घेतलेले कर्ज फीटतील घरगूती समस्या सुटतील .घरातील मोठया ची तब्येतिची काळजी घ्यावि.
?कन्या- आपणाला या सप्ताहात संतती सम्बधी काही समस्या जाणवतील विदयार्थी वर्गाला शिक्षण संबंधी अडचणी येतील परंतु बाकी कामा साठी अनुकूल काळ राहील.आर्थिक स्थितीत चढउतार जाणवेल.मित्राचे सहकार्य लाभेल सरकारी कामात यश मिळेल. वरिष्ठांना जुने मित्र भेटतील.महिलांना मंगलकार्यात भागघेऊ शकतील. अविवाहित तरुण मंडळी चे विवाह योग येतील.
?तुला-व्यापारी वर्गाला व्यापारात समस्या येतील.त्यामुळे या काळात नवीन गुंतवणूक करू नये.नौकरदार लोकांना ऑफिसमद्ये वरीष्ठ लोकांकडून त्रास होईल. या काळात सहनशीलता बाळगावी.द्रव पदार्थ व्यवसाय करणाऱ्याना लाभ दायक काळ आहे.शत्रूवर विजय मिळवाल.महिलांना खरेदीचे योग येतील.
?वृश्चिक-सप्ताह चा सुरवातीला एकदोन समस्या जाणवतील परंतु आपण त्या योग्य रीतीने सोडवाल.त्या नंतर काळ अनुकूल राहील कामात प्रगती होईल . या काळात रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे कुणाचे मन दुखवले जाणार नाही याची काळजी घ्यावी.विदयार्थी वर्गात आत्म विश्वासात वाढ होईल .त्यामुळे यशस्वी व्हाल.याकाळात वाहन सावकाश चालवावे.
? धनु-यासप्ताहात आपणास मिश्रफळ मिळेल प्रॉपर्टी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तर यश मिळेल. नवीन काही खरेदीचे योग येतील नोकरीत असणाऱ्याना वरिष्ठांनकडून मान सन्मान मिळेल.परंतु या काळात प्रकृती नरम गरम राहील.व्यापारी वर्गाला व्यापारात नफा होईल. महिलांना कौटूबिक सौख्यात वाढ होईल.मुलांना सहलीचा आनंद घेतायेईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
?मकर-या काळात विवाहित लोकांना संतती चे योग येतील तसेच या काळात प्रॉपर्टी संबधी वाद होण्याची शक्यता आहे. तयामुळे कोर्टकचेरीत जावे लागू शकते.व्यापारी वर्गाने या काळात नवीन योजना आखाव्यात त्या पुढे कामात येतील .वयस्कर लोकांना गुडघे दुःखी चा त्रास या काळात जाणवेल.याकाळात प्रवास टाळावा.
?कुंभ-या काळात महत्व पूर्व निर्णय घेण्यात यश मिळेल. कामात गती येईल त्यामुळे मन प्रसन्न राहील विवाहयोग्य व्यक्ती चे विवाह जमतील तसेच महिलांना नवीन काही तरी शिकायला संधी मिळेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल कुटूंबिक कलह दूर होतील.जुने मित्र भेतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील.या काळात आपण पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल.
?मीन-याकाळात आपण कुणाला पैसे उसने दिले असतील तर ते परत येतील.जे लोक सरकारी कामात असतील अशा लोकांना बढती चे योग येतील किंवा जे नौकरीच्या शोधात असतील त्याना नोकरी मिळेल महिलांना घरातील वरिष्ट व्यक्ती च्याप्रकृतीची काळजी घ्या वि लागेल.तरुणांनी वाहन सावकाश चालवावे. तसेच विद्यार्थी वर्गाला अभ्यासा कडे दुर्लक्ष करू नये.
?जोतिष?
उषा सुभेदार
कोरे गल्ली ,शहापूर
बेळगाव
फोन-8762655792,
8618073328