ट्रक ने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना ए पी एम सी रोड वर शनिवारी सायंकाळी घडली आहे.
रहदारी पोलीस निरीक्षक आर आर पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार मुरली पम्मार, वय ३३, रा.रामदुर्ग असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
के एस आर टी सी मधील ड्युटी संपवून दुचाकीवरून बेळगावातील त्याच्या राहत्या घरी परतणाऱ्या बस चालकास ट्रकने मागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकने पाठी मागून दिलेल्या ठोकरीतफरफटत गेलेल्या मुरली पम्मार यांच्या डोकीला जबर मार लागला आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी देखील माहिती मिळाली आहे.