खाय के पान बनारसवाला, हे प्रसिद्ध चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचे गाणे अजूनही गाजत आहे, याच प्रमाणे आता आपल्या बेळगावमध्ये खै के पान एसी शोरूमवाला असे म्हणावे लागेल. बेळगावच्या टिळकवाडी भागात शुक्रवार पेठ येथे एक नवी पानपट्टी नव्हे तर पूर्णपणे वातानुकूलित असा पान महल उभारण्यात आला आहे. आजपासूनच हा *अभिषेक पान महल* सुरू झाले आहे.
पण मिळण्याचे दुकान म्हणजे पानपट्टी ची आठवण काढली की पांढरा डगला घातलेला आणि एक पेटीवर चढून बसलेला पानवाला डोळ्यासमोर येतो, त्याचे स्वतःचे तोंड पानाच्या तोबर्याने भरलेले असते, इकडे तिकडे त्या रंगलेल्या तोंडातून पिचकाऱ्या मारत त्याचे काम चालते आणि त्याच्या त्या रंगलेल्या तोंडाकडे बघून कात जरा जास्त मारा ची सूचना जाते, आजकाल असे पानवाले गायब झाले, काळाच्या ओघात हरवून गेले पण पान खाणाऱ्याची पंचाईत झाली, पान खाणाऱ्यांना चांगले पान बनवून देणाऱ्यांचा शोध घेत फिरावे लागत आहे. अशा काळात बेळगाव मध्ये पान मिळण्याचे शोरूम सुरू करून अनेकांच्या तोंडात पान रंगवण्याचा नवा आगळा उपक्रम किंवा प्रकल्पच अभिषेक पान महल ने हाती घेतला आहे.
किरण पी कलाल या व्यक्तीने हे शोरूम बनवले असून ते पूर्णपणे वातानुकूलित असणार आहे. सर्व प्रकारची पाने याठिकाणी मिळणार आहेत. २० रुपयांपासून १५०० रुपये किंमतीची दर्जेदार पाने याठिकाणी मिळणार आहेत. पानांचे अनेक प्रकार आहेत, पानाचे रसिक कधी कुठल्या पानाची फर्माईश करतील याचा नेम नसतो, विशेष म्हणजे काही ठराविक मंडळींना त्यांचे ठराविक पानंच लागते, अशा सर्व गोष्टींचा विचार करून हा पान महल सेवा देणार आहे.
लग्न, पार्टी आणि कार्यक्रमात मसाला किंवा स्वीट पान जेवण झाले की लागतेच, अशा कार्यक्रमांनाही ऑर्डर आली की याठिकाणी पाने मिळून जाणार आहेत.
कलकत्ता, बनारसी, किमाम, बाबूल, एकसो बिस तिनसो, तंबाखु, बिगर तंबाखु, साधा, चमन चटणी , व्हॅनिला कुल्फी बदाम असे फ्लेवर सह माहीत असणाऱ्या बेळगावकरांना आता पानांची विविध रूपे आणि नावे पाहायला मिळतील…. फक्त एकच करा पिचकाऱ्या मारताना तेवढे सावधान……………☺️