खानापूर तालुक्यातील एक तरुणाने आपल्या प्रेयसीच्या सोबत प्रेमचाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून खळबळ उडवली आहे. सध्या सगळीकडे त्या व्हिडिओची चर्चा जोरात आहे.
त्या व्हिडिओतली मुलगी अल्पवयीन आहे, यामुळे महिनाभरापूर्वी हा व्हिडिओ चित्रित होऊनही तिने तोंड उघडले नाही. जास्त आवाज कराल तर जीवाने मारू अशी धमकीही देण्यात आली आहे. हा व्हिडिओ पसरवण्यात आल्याने त्या नववीत शिकणाऱ्या मुलीने शाळेला जाणेही बंद केले असल्याची माहिती हाती आली आहे.
आपल्या दहशतीचा वापर करून यापूर्वीही अनेक मुलिंचे जीवन त्या तरुणाने उद्धवस्थ केले आहे, या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस तसेच महिला व मानव हक्क आयोगाने गंभिर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
खानापूर तालुका हा सुसंस्कृत लोकांचा तालुका आहे, आशा तालुक्याच्या नावाला बट्टा लावणाऱ्या त्या महाभागाची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी, अन्यथा अनेक मुलींचे आयुष्य उद्धवस्थ होण्याचा धोका आहे.
Trending Now