आर्मी वाईफ्स वेल्फेअर असोशिएशनतर्फे लष्करी जवानांच्या वीर नारी आणि वीर मातांचा विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात आला . देशात मराठा सेंटर ने दिलेल्या योगदानाबद्दल तिसऱ्या ‘मराठा लाईट इन्फट्री डे’ चे देखील आयोजन करण्यात आले होते
मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये सन्मान कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला .आर्मी वाईफ्स वेल्फेअर असोसिएशनच्या चेअरपर्सन वृंदा कलवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या .
आर्मी वाईफ्स वेल्फेअर असोसिएशनच्या चेअरपर्सन वृंदा कलवाड शिंदे यांच्या हस्ते वीर नारी आणि वीर माता यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला . भारत सरकारच्या विविध योजना आणि वीर नारी ,वीरमाता यांचे हक्क यांची माहितीही यावेळी देण्यात आली . 1965,1971 आणि 1999 युद्धात हुतात्म्य पत्करलेल्या एकूण 18 वीरनारी , 35 वीरमातांचा सन्मान करण्यात आला . महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून वीरनारी आणि वीरमाता सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित होत्या .
मेजर मनविर सिंह यांनी वीर नारी साठी सरकार च्या योजना बद्दल माहिती दिली .यावेळी ब्रेगेडियर गोविंद कलवाड यांच्या सह सेंटर चे अन्य अधिकारी देखील उपस्थित होते