बेळगाव-गणित या विषयाची भीती बहुसंख्य विद्यार्थ्यांत असते.विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती निघून जावी आणि त्यांना गणित विषयात गोडी निर्माण व्हावी यासाठी बेळगावचे उद्योजक आणि गणिताचे अभ्यासक विलास बोकील यांनी एक उपक्रम हाती घेतलाय.बेळगावच्या आर्ष विद्या आश्रमातील विद्यार्थ्यांशी गणितासोबत गंमत जम्मत विषयावर बोकील यांनी संवाद साधला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गणितातील अनेक सोप्या पद्धती रंजक पद्धतीने समजावून सांगितल्या. गणित हा विषय अवघड नसून तुम्हीं मनातून ती भीती काढून टाका.गणित विषय समजावून घेतला की त्याच्या सारखा सोपा विषय नाही असे बोकील यांनी उदाहरणांसह सांगितले.बिद्यार्थ्यांनीही ते शिकवत असताना आपल्या मनातील शंका विचारल्या.बोकील यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.विद्यार्थ्यांच्यातील गणित विषयाची भीती निघून जावी आणि त्यांच्यात विषयाची गोडी निर्माण व्हावी यासाठी बेळगावमधील शाळांमध्ये गणितासोबत गंमत जंमत विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे मिशन हाती घेतले आहे.आर्ष विद्या आश्रमातील कार्यक्रमाला स्वामी चितप्रकाशानंदजी ,उद्योजक दिलीप चिटणीस आणि शिक्षिका सिद्धी कुलकर्णी उपस्थित होत्या.