अग्निशामक दलाच्या जवानांनी असमर्थता दाखवल्याने अखेर चंद्रकांत नावाच्या एका व्यक्तीने विहिरीत उतरून त्या अनोळखी व्यक्तीला वाचवले आहे
उपलब्ध माहितीनुसार त्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर गंभीर जखम झाल्याचे दिसले आहे. विहीर न दिसल्याने उंचावरून पडल्याने तो व्यक्ती जखमी झाला असून त्याला १०८ रुग्णवाहिकेतून सिव्हील हॉस्पिटल कडे पाठवण्यात आले आहे.
नागरिकांच्या जीवाची परवा न करता याप्रकारे उघडी धोकादायक विहीर ठेवणे किती घातक ठरते हेच या घटनेवरून दिसून आले आहे.
आपला जीव धोक्यात घालून त्या चंद्रकांतने विहिरीत उतरण्याचा धोका पत्करला नसता तर त्या व्यक्तीचा जीव गेला असता. दीड तास घोळ घालून काहीही मदत करू न शकलेल्या अग्निशामक दलाने सुधारणा करून घेण्याची गरज आहे.
विहिरीवर झाकलेल्या सिमेंटच्या पत्रा ओलांडून जातेवेळी सदर युवक या धोकादायक विहीरीत पडला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पडलेला युवक दारूच्या नशेत धुंद होता तो अनगोळ चा रहिवाशी आहे. या विहिरी शेजारी अनेक दारूची दुकानं असल्याने मद्यपिंची या ठिकाणी वर्दळ असते. अश्या विहिरी पासून पालिका प्रशासन खुशाल आहे एकीकडे जिल्हाधिकारी जिल्ह्यातील सर्व बंद असलेल्या कुपनलिका बुझवल्याचा दावा करतात तर दुसरीकडे महा पालिकेच्या फुटपाथ वर पडक्या विहिरी उघड्याच आहेत. प्रशासनाला दुसऱ्याच कुसळ मात्र आपल्या पदरांतल मुसळ दिसत नाही अशीच अवस्था आहे.