कधीतरी हे अघटित घडणार अशी शक्यता असताना तसेच घडले आहे. ईसर्या रेल्वे गेट नजीक रस्ता करताना उघड्या पडलेल्या विहिरीत कोणीतरी पडले आहे, ते कोण आहे याचा शोध सुरू असून पोलीस व अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले आहेत.
आज संध्याकाळी फूटपाथ वरून जात असताना ही विहीर न दिसल्याने एक लहान मुलगा त्यामध्ये पडला असल्याची चार्व्ह सुरू असून लोकही जमले आहेत. या विहिरीत उतरून अग्निशामक दलाचे जवान प्रयत्न करत असून स्थानिक लोकांचीही मदत घेण्यात येत आहे.