कोणताही बदल एका रात्री होऊ शकत नाही हे लक्षात घ्या, ही एक प्रक्रिया आहे, हा अर्थसंकल्प हे त्याचेच स्वरूप आहे, एक काळाची गरज म्हणून आणि अतिशय वाईट परिस्थितीतून जात असलेल्या आर्थिक परिस्थितीवर हे एक उत्तर आहे. या स्थितीतून बाहेर काढण्याण्यासाठी हा अर्थसंकल्प मदत करेल असा विश्वास वाटतो.
यंदाच्या अर्थसंकल्पाला ऐतिहासिक संदर्भ आहेत, मूल्य आहे. भारताने यंदा मोठ्या आर्थिक पायऱ्या सर केल्या आहेत, चलन बदल आणि जी एस टी हे बदल आव्हान आहेत.
सध्या जागतिक अर्थव्यवस्था विकासात्मक अर्थव्यवस्थेसाठी मोठी भूमिका निभावत आहे, आपला भारत असो किंवा इतर कोणताही देश असो याला पर्याय नाही.
जेंव्हा आपण भारताचा उल्लेख जागतिक महासत्ता म्हणून करतो तेंव्हा उपलब्ध स्रोतांचा वापर करून जागतिक जागतिक स्तरावरील विकास साकारणे महत्वाचे आहे. हेच आमचे लक्ष्य असले पाहिजे.
मी इथे मुद्दामहून आणि अभिमानाने नमूद करतो की भारतीय अर्थव्यवस्था ही जगात चवत्या क्रमांकाची नोकऱ्या मिळवुन देणारी व्यवस्था ठरत आहे.
आमची अर्थव्यवस्था सध्या अतिशय दोलायमान स्थितीत आहे, यातुन हा अर्थसंकल्प बाहेर काढेल, त्याचे माध्यम अतिशय नियोजनात्मक असेच आहे.
आमच्या अर्थमंत्र्यांनी दीर्घकालीन फायद्यावर भर दिला आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्राला थेट दिलासा नसला तरी सामाजिक, आरोग्य, शिक्षण आणि इतर क्षेत्रांच्या बाबतीत आश्वासक तरतुदी केल्या आहेत.
अर्थसंकल्पाचे विवरण तीन सत्रात करता येईल
१. आर्थिक सर्वेक्षणावर आधारित भारतातील अर्थसंकल्पपूर्व वातावरण
२. जीएसटी आणि चलन बदलाचा परिणाम
३. अर्थसंकल्पाच्या अपेक्षा हे ते तीन मुद्दे आहेत
अपुऱ्या अपेक्षा
१. काही कर, मुच्युयल फंड, आयकर आणि डीमंटिंग मध्ये दिलासा नाही.
३. विदेशी जीवनावश्यक औषधांवरील कर तसेच जेनेरिक औषधाबद्दल ठोस निर्णय नाही.
३. मोबाइल सेवांच्या दरांवर निर्णय नाही.
४. FMCG Goods वर करसवलत नाही.
६. आयकर दरात बदल नाही.
६. आयकर भरणा नियमात बदल नाही
स्वागतार्ह मुद्दे
१. सामाजिक आरोग्य योजना.
२. शिक्षण योजना ( Black board to Digital Boards)
३. राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना (Nation health Protection Scheme)
४. २४ नवी वैधकीय महाविद्यालये
५. कापड उद्योगाला निधी
६. प्रत्येक उद्योगाला ओळख क्रमांक UAE
७. ज्येष्ठ नागरिकांना सवलती
8. शेतकऱ्यांसाठी operation green.
हा अर्थसंकल्प दीर्घकालीन सकारात्मक फायदे देणारा आहे.