कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष जी परमेश्वर यांना आपल्याच पक्षाच्या खानापूर येथील कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. सांबरा विमानतळावर त्यांना खानापूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव घालून प्रचंड घोषणाबाजी केली.
खानापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नाव सांगून अंजलीताई निंबाळकर यांनी आपल्या घरासमोर खासगी कार्यक्रम ठेवला आहे. हा पक्षाचा मेळावा होऊ शकत नाही, असा आरोप करून त्यामुळे त्याला तुम्ही जाऊ नव्हे, अशी मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी केली.
अंजलीताई यांनी हळदी कुंकू ठेवला आहे आणि त्याला काँग्रेस मेळाव्याचे नाव दिले आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना बोलावून त्या आपले वैयक्तिक मार्केटिंग करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाबूलाल बागवान, मेघा देसाई, नसीम कित्तूर, प्रकाश पाटील, शंकरगौडा पाटील, मूनाफ सनदी, लियाकत उच्चनन्नावर, गीता पुजार यांचा यामध्ये समावेश होता, काँग्रेस मध्येही दुही आहे हे यामुळे स्पष्ट झाले असून हा प्रकार अंजलीताईंना जड जाणार असे दिसत आहे.