Saturday, December 21, 2024

/

दड्डी मोहनगा यात्रेला भाविकांचा महापूर

 belgaum

हुक्केरी तालुक्यातील दड्डी मोहनगा गावच्या सुप्रसिद्ध भावेश्वरी देवीची यात्रा कालपासून सुरू झाली आहे. आज गुरुवार हा यात्रेचा मुख्य दिवस यामुळे भाविकांचा महापूर दड्डीकडे जात आहे. या देवीला केलेला नवस पावतो असे मानले जाते यामुळे दरवर्षी लाखो भाविक या यात्रेला जात असतात.

Mohanaga
दरवर्षी सलग तीन दिवस ही यात्रा होते. यंदा बुधवार हा यात्रेचा पहिला दिवस होता, पण याच दिवशी चंद्र ग्रहण आल्यामुळे भाविकांची संख्या काल जरा कमी होती, मात्र आज सकाळी पासूनच लोक दड्डी कडे प्रयाण करत आहेत.

Mohanaga
आज मध्यरात्री देवीला बकरी आणि कोंबड्यांचे बळी देऊन नवस फेडले जातात. यामुळे दड्डी येथे आज रात्री प्रचंड गर्दी होणार आहे, तर ही गर्दी उद्या यात्रेच्या शेवटच्या दिवसापर्यंत कायम असणार आहे.
तमाम सीमाभागाची आराध्य देवता म्हणून भावेश्वरी देवीला मान आहे, यामुळे भाविक प्रचंड प्रमाणात जात आहेत, ही गोष्ट लक्षात घेऊन परिवहन मंडळाने बेळगाव, संकेश्वर, चिकोडी इथून बस जास्त सोडल्या आहेत, जास्तीत जास्त भाविक बेळगावहून जात आहेत, तर मुंबई, पुणे, हुबळी पासून भाविक येऊ लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.