कोरे गल्ली आणि कचेरी गल्लीच्या कोपऱ्यावर सहा महिन्यांपूर्वी नवीन ड्रेनेज लाईनसाठी खणून ठेऊन अजून काम पूर्ण केलेले नाही. धूळ उडून त्रास होत असताना लोकांना श्वासोस्वास घेणेही अवघड झाले आहे, श्वासाचे विकार होत असून मनपाने अस्थमा भेट दिल्याची चर्चा आहे.
सप्टेंबर महिन्यात ही खुदाई झाली आहे, पण अजून रस्ता झाला नाही, घराघरात धूळ शिरत आहे. कायम विनंती करूनही मनपा रस्ता करत नाही.नगरसेवकानेही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. आतातरी लक्ष द्यावे अशी मागणी सुरू आहे.