बेळगावात उत्पादन होणार दूध आता जम्मू काश्मीरला देखील जाणार आहे . के एम एफ च्या वतीने हे दूध जम्मूला पाठवण्यात आलं आहे. बेळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या वतीने आमदार विवेक पाटील यांनी जम्मूला दूध घेऊन जाणाऱ्या पहिल्या ट्रक ला हिरवा झेंडा दाखवत रवाना केलं;
के एम एफ चा नंदिनी ब्रँड हा जम्मूला पाठविण्यात आला असून तीन ते चार दिवसात तिथे पोचणार आहे काश्मीर सह उत्तर भारतातील राज्यातून हा ब्रँड विकला जाणार आहे . १८० मिली २०० मिली आणि ५०० मिलीची दुधाची पाकीट पाठवली आहेत
खास फिनलँड हुन २२ कोटी किंमतीची आणलेली अत्याधनिक पद्धतीने दूध पॅकिंगची मशीन सह नवीन युनिट बेळगावात सुरु करण्यात आलं आहे त्यातील पॅक केलेलं दूध उत्तर भारतातील राज्यात पाठवलं जाणार आहे .