बेळगावच्या जिल्हा पंचायत सभागृहात जसे आमदार अरविंद पाटील मराठीत बोलले .. विरोध झाल्यावर हिंदीतून बोलले तसं गेल्या चार वर्षात त्यांनी कर्नाटक विधान सभेत का आवाज उचलला नाही? विधान सभेत सीमा भागातील मराठी जनतेला मराठीत परिपत्रक देण्यास का जोराची भूमिका घेतली नाही? त्यांचं मराठी बोलणे इथे का म्यूट झाले? असे प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
सोमवारी बेळगावातील जिल्हा पंचायत मासिक बैठकीत खानापूर विधानसभा मतदार संघास निधी मंजूर करून घेण्यासाठी अरविंद पाटील यांनी सभागृहात मराठीतून बोलायला सुरुवात केली यावेळी माजी मंत्री आमदार लक्ष्मण सवदी यांनी हस्तक्षेप करत आमदार पाटील यांना विरोध करत कन्नड मधून बोला सभागृहात मराठी कुणाला समजत नाही असं म्हणताच पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी देखील तीच री ओढत कन्नड मधूनच बोला अशी मागणी केली या नंतर आमदार अरविंद पाटील हिंदीतून बोलले तरी देखील पालक मंत्र्यांनी मला हिंदी देखील समजत नाही कन्नड मधूनच बोला अशी सूचना केली तरी सुद्धा पाटील यांनी शेवटी आपले विचार हिंदीतूनच व्यक्त केले.
विधान सभा निवडणूक जवळ आल्याने अनेक जणांना मराठीचा पुळका येऊ लागला आहे खानापुरात कन्नड लोकांशी घरोबा केला असल्याचा आरोप आमदारावर होत असताना मराठी बैठकीत झालेला विरोधा वरून संशय घेतला जात आहे. आमदार लक्ष्मण सवदी हे अरविंद पाटलांचे राजकीय गुरु मानले जातात हे सर्वश्रुत आहे त्यांचं ‘पालकमंत्री प्रेम’ देखील सर्वानाच ठाऊक आहे अश्यात मुद्दाम किती आमदारांना मराठीची तळमळ आहे हे दाखवण्यासाठी जिल्हा पंचायत सभागृहात मराठीला पालक मंत्री आणि सवदी कडून मराठी बोलायला विरोध दाखवला गेला काय अशी चर्चा पत्रकार कक्षात रंगली होती.सभागृहात कायमच सवदी अरविंद पाटलांना का विरोध करतात? गुरूंचा शिष्याला का विरोध ही मॅच फिक्सिंग तर नाही ना ?