आगष्ट २०१७ मध्ये झालेल्या पावरग्रीड ने विद्युतीकरणा साठी भारतीय रेल्वे कडून भागीदारी केली असून या अंतर्गत लोंढा मिरज हा १८९ कि मी रेल्वे लाईन विद्युतीकरणाचा २०८. १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे .
भारतीय रेल्वेच्या मिशन इलेक्ट्रिफिशन नुसार ३ नोव्हेंबर २०१६ रोजी २४४०० किलो मीटर रेल्वे मार्गआगामी पाच वर्षात विद्युतीकरण करण्याचा प्रस्ताव होता . ३ फेब्रुवारी १९२५पासून इलेक्ट्रिक ट्रॅक्शन ची सुरुवात करण्या पासून आता पर्यंत विद्युतीकरण केलं गेलेलं आहे.
हा महत्वाकांक्शी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रथमच भारतीय रेल्वेने व्यावसायिक दृष्टिकोन बदलला असून रेल्वे विकास निगम लिमिटेड ,इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि रेल इंडिया टेक्नो इन्फॉरमेशन सर्व्हिस या सारख्या नवीन वीज निर्मिर्तीच्या कामावर ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. मिशन इलेक्ट्रिफिकेशन चा एक भाग म्हणून अलीकडील मागील दहा वेगवेगळ्या विद्युतीकरण प्रकल्पा मध्ये २५१६ मार्ग किलो मीटरचे मूल्य २७९७ कोटी रुपये एवढे होते .