चौथ्या रेल्वे गेट जवळ धड आणि एक हात विरहित सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं असून सदर मृतदेह एका डॉक्टराचा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जाधवनगर बेळगाव येथील शिव कुमार पाटील यांचा मृत देह असून त्यांनी रेल्वे खाली झोकून आत्महत्या केलो असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे .
शिव कुमार यांनी मानसिक दबावाखाली आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.डॉक्टर यांनी रेल्वे खाली झोकून आत्महत्या केल्याने ट्रॅक वर आत्महत्या केलेल्यांची संख्या वाढलो आहे.रेल्वे पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे