Thursday, January 2, 2025

/

ताई आणि आमदारांचा तोल गेला

 belgaum

खानापूरचे आमदार अरविंद पाटील व काँग्रेस च्या इच्छूक उमेदवार अंजलीताई निंबाळकर यांच्यातील वादावादीचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, या व्हिडिओत आमदारांनी ताईंच्या हातचा माईक हिसकावून घेतला तर त्यापूर्वी आमदारांवर ताईंनी राज्यसभेसाठी मतदान करण्यासाठी पैसे खाल्ल्याचे आरोप केले आहेत, यात दोघांचाही तोल गेल्याने हा वाद घडला आहे.
ताई ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाच्या राज्यसभा आणि राष्ट्रपती उमेदवारास आमदारांनी मतदान केले आहे, त्यासाठी पैसे दिले तरी ते त्यांच्याच पक्षाने दिलेले असतील, मग आपल्या पक्षाने पैसे वाटले हे जाहीर सभेत सांगून ताईंनी दुसऱ्याच्या तोंडाला काळे लावायच्या नादात आपले हातही काळे आहेत हेच दाखवून दिले आहेत.Anjali arvind khanapurवायरल झालेल्या व्हीडिओत ताईंनी सीमा प्रश्नाचा उल्लेख केलाय… ताईंना इतकं दिवस नाही मात्र सीमा प्रश्नाचा पुळका आताच का?असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

दुसऱ्या बाजूला आमदार अरविंद पाटील यांनी जर मतदान करण्यासाठी पैसे घेतले नसते तर ते असे व्यासपीठावर उठून एका महिलेच्या हातातील  माईक काढून घेऊ शकले नसते, त्यांनी सरळ सरळ आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे, यामुळे पैसे देणाऱ्या पक्षाच्या ताईंनी भान सोडले तरी अरविंद पाटील टीकेचे धनी होऊन बसले आहेत.
राजकारण हे युद्ध मानले जाते, आणि युद्धात सारेकाही क्षम्य म्हणतात, या अर्थाने बघितल्यास आता यापुढे असे आरोप, भांडाफोड आणि हिसका हिसकी सुरू राहणार हे नक्कीच आहे.

 

अंजली ताई आणि आमदार अरविंद पाटील यांच्या तला सोशल मीडिया वर वायरल झालेला व्हीडिओ कसा आहे काय आहे त्यात करा खालील लिंक क्लिक पहा-

https://m.facebook.com/story.php?story_fbid=542855979405333&id=375504746140458

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.