बेळगाव शहराच्या अनगोळ आणि मजगाव च्या मध्यावर असलेल्या चौथ्या रेल्वे गेट जवळ शीर विरहित धड सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
कोणीतरी शुक्रवारी रात्री खून करून हा मृतदेह फेकला असून या देहाचे शीर तसेच डावा हातही गायब आहे, यामुळे हा मृतदेह पाहताना थरकाप उडत आहे.
काही जण हा रेल्वे अपघात किंवा आत्महत्येचा संशय व्यक्त करत आहे, रेल्वेचा भाग आदळून तो उडून पडला असावा आणि शीर व हात कुठेतरी उडून पडले असावे असाही संशय आहे.
पोलीस तपासानंतर नेमके काय ते स्पष्ट होईल.
Trending Now