आज प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील राजपथावर झालेल्या फेरीत महाराष्ट्राचा शिवकालीन चित्ररथ अवतरला होता, स्वतः शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे असा हा चित्ररथ देशभरात चर्चेला आला, यावरील शिवाजी राजे आणि मावळ्यांच्या मूर्ती घडवल्या आहेत बेळगावचे मूर्तिकार संजय किल्लेकर यांनी.
शिवप्रेमी तरुणांनी या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा विशेष गौरव केला आहे.त्यांच्या सहकाऱ्यांनाही गौरवण्यात आले.
मेघन लंगरकांडे , संतोष कणेरी,सतीश गावडोजी,सौरभ जांभळे, ईश्वर मासेकर,विनायक कणेरी,निलेश कणेरी,रमेश चौगुले,दैविक हळदणकर,सुधीर कालकुंद्रीकर हे शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.