आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इतर राष्ट्रीय पक्षा बरोबर समितीनेही जनजागृती मोहीम हाती घ्यायला सुरू केली आहे. शहर समितीच्या महिला आघाडीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
‘मी समितीचा समिती माझी’असं लिहिलेला स्टीकर चिकटवण्यात आली.दुचाकी आणि घरा वर स्टीकर चिकटवण्यात आली.महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी या मोहिमेची सुरुवात केली.यावेळी महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या.