बेळगाव शहरात पार्किंग च्या दरावरून नेहमीच वादळ सुरू आहे, वाढीव शुल्क भरून घेऊन पार्किंग कंत्राटदार लूट करतात, याबद्दल ऑनलाईन तक्रार दाखल झाल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाने आपले दर निश्चित केले आहेत.
धर्मवीर संभाजी चौकात कार पार्क करायची झाल्यास चार तासाला २० आणि दोन तासाला १० रुपये दर निर्धारित करण्यात आला आहे.
पूर्वी कंत्राटदार ३० रुपये घेत होते, आता याला चाप बसणार आहे.नागरिकांनी जागरूकता बाळगण्याची गरज आहे.