कोणत्याही कारणासाठी मी जे डी एस प्रवेश करण्याचा प्रश्नच उदभवत नाही मी कुणा सोबत बोलणीही केलेली नाही मात्र आगामी दोन निवडणुका नंतर मुख्यमंत्री होणे ही माझी महत्वाकांक्षा आहे. अशी प्रतिक्रिया माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे.बेळगावात माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करणार असून पक्ष संघटना बळकट करणार आहे.आगामी निकडणुकीत माझ्या समर्थकांना तिकीट डावलण्याचे काम सुरू आहे माझ्या समर्थकांना उमेदवारी मिळू देत जिल्हा काँग्रेस मधील नाराजी दूर करू असे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर जारकीहोळी यांचं हे वक्तव्य भरपूर काही सांगून जात आहे.जारकीहोळी समर्थकांना तिकीट डावलल्यास काय गणितं होतील यावर यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.