गेली 60 वर्ष मराठी प्रेमापोटी लाठ्याकाठया झेलत प्रसंगी जीवाची बाजी लावत आंदोलन करणाऱ्या सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी कोल्हापूरकर माणूस सह्याद्रीच्या कड्या सारखा अभेद्य उभा आहे त्याला चंद्रकांत पाटील यांनी स्वार्थी राजकरण करत छेद दिला आहे.
गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रातील जनतेने सीमावासीयांना कायम पाठिंबा देत प्रसंगी लढ्यात स्वतःला झोकून देत आली आहे. त्या परंपरेला दादांनी फाटा देत सीमावासीयांच्या भावना दुखावल्या आहेत.कोल्हापूरचा जरी फेटा आणि तांबडी माती याच्यात इमानदार माणसं जन्माला आलेत.मराठी माणसाच्या पाठी मागे बळकट मनगटाने उभारणारी ही लोकं या बेईमान दादाला माफ करणार का?हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आलाय.
येळ्ळूर वासीयांच्या पाठीवर कर्नाटक पोलिसांनी फोडलेल्या काठ्याच्या जखमा, मराठी जनतेवर होणार भाषिक अत्त्याचार, मराठीचं केलं जाणार निर्मूलन न दिसता दादां कानडी पाळणा जोजवयाला लागले आहेत.मराठी माणूस मराठी माणसाशी कधीही प्रतारणा करत नाही असा इतिहास आहे त्यातच कोल्हापुरी माणूस तर घेतलेल्या वचनाला आणि दिलेल्या शब्दाला जागणारा म्हणून जगात ओळखला जातो आणि त्यात हा खंडूजी खोपडा कुठून आला हे कोल्हापूर करांनी शोधलं पाहिजे.
मागच्या दारांनी विधान परिषदेत गेलेला हा भोंगळ नेता याला समाज मनाचं भान नाही, मातीशी इमान नाही की मराठी माणसाच्या प्रश्नाची जाणं नाही यावर विचार व्हावा संघाच्या मुशीतून आलोय असा उदोउदो करून घेणारे आणि बांडगूळा सारखं सत्तेला चिटकून बसणारे ज्यांना मराठी जनतेचा आणि मराठी मनाचा कोणताही आदर नाही केवळ सत्ता पिपासूपणा हा ज्यांच्या नसा नसात भरला आहे त्याला राजश्री शाहूंची जनता माफ करणार काय?
कोल्हापूर कर म्हणजे रांगडा गडी ,आलेल्या पाहुण्याला आपल्या ताटातील अर्धी भाकरी देईल ही त्याची ख्याती, एकदा शब्द दिला तर जीव गेला तरी माग हटणार नाही ही त्याची धमक, त्या अंबाबाईच्या पवित्र नगरीत असणाऱ्या कोल्हापूर वासीयांनी या चंदू पाटलाची जागा दाखवून द्यावी हीच सीमा वासीयांची आर्थ हाक आहे.
पंच गंगेच्या पाण्याला गंगेच्या पाण्यापेक्षा बेळगावकर जनता पवित्र मानते या पाण्यात आचमनं चालत नाहीत तर वीरांच्या धमण्यात जोश भरण्याच काम करणारी गंगा त्याची आण घेऊन बेळगावकर जनता कानड्याशी लढत आहे …कोल्हापूरकरानो आम्हाला साथ द्या…