चंद्रकांत दादा पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी गेलेल्या सिमावासीय आंदोलकांना कोल्हापूर पोलिसांनी स्थानबद्धतेत ठेवले आहे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील हे सध्या दादा आणि सरकार च्या वतीने चर्चा करीत आहेत.
कोल्हापूरच्या अलंकार हॉल मध्ये सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना ठेवण्यात आले असून माजी महापौर सरिता पाटील यांनी आजवर एकही वेळ बेळगावला सीमाप्रश्नासाठी न आलेल्या दादांनी सर्वप्रथम बेळगावला येऊन तमाम सीमावासीयांची माफी मागावी तरंच आम्ही हटू असा इशारा दिला आहे.
पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी यापूर्वीच दादांनी माफी मागितली असून हवं तर फोन वरून बोला अशी अटकळ घातली मात्र आम्ही त्यांच्याशी फोनवर बोलण्यास इच्छुक नसून त्यांनी केलेल्या अपमानाने संपूर्ण सीमाभाग दुखावला गेल्याने आता त्यांनी जाहिरपणेच माफी मागावी अशी अट सरिता पाटील यांनी लावून धरली आहे.
दादांनी बेळगावात यावे, सर्वकाही कन्नडमधून चालणार असा फतवा काढणाऱ्या बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही जाब विचारावा आणि हे जमत नसेल तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली आहे.
अध्याप चर्चा सुरूच आहे, अधिक अपडेट साठी वाचा बेळगाव live.
Trending Now