Thursday, February 6, 2025

/

भाजपच्या दंडाची बेंडकुळी मराठी माणसालाच दाखवणार काय?

 belgaum

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने आपली पोलिसी ताकत आपले मराठीद्रोही महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना दाखवावी, ही ताकत सीमावासीयांना दाखवू नव्हे, असे उदगार सध्या सर्वसामान्य सिमावासीय काढत आहेत.

Kop mes
गोकाक येथे येऊन स्वतःला सीमावासीयांचा समनवयक म्हणवून घेणारा चंद्रकांत दादा जन्माला आला तर कर्नाटकात जन्माला या असे फाजील पणे बोलून जातो आणि त्याचा निषेध करण्यास गेलेल्या सीमाभागातील जनतेला अटक केली जाते, यातून महाराष्ट्रातील भाजपचा कारभार दिसून आला आहेत, या कृत्याने सिमावासीय खवळून गेला आहे, भाजपने या दादावर कारवाई केली नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात भाजपच्या त्या मराठी द्रोही नेत्यांचे पुतळे जाळ ण्यात येतील असा इशारा देण्यात येत आहे.
सीमाप्रश्न महाराष्ट्राचा आहे, तो सीमावासीयांचा नाही, पण महाराष्ट्राचा भाग महाराष्ट्राला मिळावा म्हणून झगडणाऱ्या कार्यकर्त्यांनाच जर महाराष्ट्र झोडपत असेल तर त्या सत्ताधारी नेत्यांची कमकुवत मानसिकता दिसून येते, कन्नड मधून बोलण्याला विरोध नाही पण एक कन्नड दुराभिमान्या अभिनेत्याची तळी उचलून धरून समस्त सीमावासीयांचा अपमान करण्याचा अधिकार भाजप किंवा या पक्ष्याच्या कुठल्याच टोकमाजीला नाही असा इशारा समस्त सीमाभाग देत आहे.
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आणि सतत सीमाभागाची बाजू घेणाऱ्या शिवसेनेने या भाजप सरकारला पायउतार करावे, प्रसंगी अच्छे दिन म्हणून सांगणाऱ्या नरेंद्र मोदींना याची कल्पना द्यावी आणि मराठी माणसाला डीवचणार्या चंदू दादाला त्याची जागा दाखवून द्यावी असा संताप उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.