महाराष्ट्रातही सिमवासीयांवर दडपशाहीच करण्यात आली असून दादांच्या घरावर आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
आवाज उठवायचा प्रयत्न केला की सीमावासीयांना नेहमीच पोलिसांच्या दडपशाहीचा अनुभव येतो, कर्नाटकात हा अनुभव येतो पण असाच अनुभव महाराष्ट्रीय भाजप सरकारच्या मराठी पोलिसांकडूनही आला आहे, सीमावासीयांच्या भावना दुखावल्या म्हणून कोल्हापूर येथे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या घरावर निदर्शने करण्यास गेलेल्या सिमावासीय आंदोलकांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे.
बेळगावच्या माजी महापौरसरिता पाटील , माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, समिती नेते मदन बामणे
अमर येळ्ळूरकर,माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, रत्न प्रसाद पवार, युवा कार्यकर्ते पीयूष हावळ, मराठी युवा मंचचे सूरज कंणबरकर,संजय सांगावकर,श्रीकांत कदम आदींचा सहभाग या आंदोलनात होता, यांच्यासह ५० हुन अधिक जणांना अटक झाली असून सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर सिमावासीयांचा मोर्चा काढण्यासाठी हे गेले होते.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर सिमावासीयांचा मोर्चा येणार असे लक्षात आल्यावर त्यांची कोल्हापूर पोलिसांनी अडवणूक केली यावेळी घोषणा देऊन दादांचा निषेध करण्यात आला.
रहेंगे तो महाराष्ट्र में … चंद्रकांत पाटील राजीनामा द्या.. अशी मागणी करून चंद्रकांत पाटील यांनी गोकाक मध्ये केलेल्या विधानाचा कोल्हापुरात निषेध करण्यात आला.
50 हुन अधिक सीमाभागातील कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.