बेळगाव जिल्ह्यात येऊन कर्नाटकचे गोडवे गाणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना समनव्यक मंत्री पदाचा राजीनामा ध्या आणि 60 वर्ष लोकशाही मार्गाने लढत असलेल्या मराठी जनतेची माफी मागा या मागणी साठी बेळगावातील मराठी युवकांनी रणशिंग फुंकले आहे.
आज मंगळवारी दुपारी कोल्हापूर मुक्कामी चंद्रकांत दादा पाटील यांच्या निवासस्थाना समोर ठिय्या आंदोलन करत दादांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे.
बेळगावातील युवक मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी उद्यानात जमले यावेळी शिवाजी महाराजांच्या मूर्तीच पूजन करून कार्यकर्ते आंदोलना साठी कोल्हापूर ला रवाना झाले.यावेळो संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासह दादा पाटलांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.