Thursday, December 26, 2024

/

साप्ताहिक राशि भविष्य -22 ते 29 जानेवारी

 belgaum
साप्ताहिक राशी काल
मेष राशी– हा सप्ताह आपल्याला मिश्र कालदायी जाईल तब्येत थोडीशी नरम राहील एखाद्या चांगल्या बातमीचे योग या आठवड्यात येतील कार्यात प्रगती होईल मित्राकडून नातेवाईकाकडून सहकार्य लाभेल. सरकारी अडकलेली कामे या आठवड्यात पूर्ण होतील.उत्पन्नात वाढ होईल आनंदी राहाल
वृषभ – मागच्या आठवड्या पेक्षा हा आठवडा बरा जाईल नोकरदार वर्गाला नोकरीचे किंवा बढतीचे योग्य येतील अर्धवट कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल या सप्ताहात घरातील भावंडांशी वाद विवाद होऊ शकतो त्यामुळे संयमाने वागावे नव्या ओळखी होतील.
मिथुन – स्वास्थ्याच्या दृष्टीने हा सप्ताह तसा मध्यम राहील स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्या महिलांना छोट्या सहलीचा आनंद घेता येईल तर नोकरीत असणाऱ्यांना बदली होण्याचे योग्य येतील त्यामुळे आपल्या कामात दिरंगाई होता कामा नये नियमाने व काटेकोर पणाने काम करावे महिलांनी कामाचा आळस करू नये
कर्क – व्यवसायात असणाऱ्यांना हा सप्ताह आपल्या भागीदाराशी किंवा व्यवसायाशी निगडित व्यक्तीशी वाद विवादाच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यवहार जपून करावे. तसेच विद्यार्थी वर्गाने या काळात अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये महिला कौटुंबिक सुखाचा आनंद घेता येईल
सिंह – या आठवड्याचा उत्तरार्ध  पूर्वार्धापेक्षा चांगला राहील पूर्वार्धात छोट्या छोट्या समस्यांना तोंड द्यावे लागेल व्यवसायात यश येईल कुटुंबा सह आपण एखाद्या समारंभाचा आनंद घ्याल विद्यार्थी वर्गाला हा काळ चांगला राहील वयस्करांनी तब्येतीची काळजी घ्यावी उत्तरार्धात स्थिती अनुकूल राहील व आपल्या कार्याचे कौतुक होईल
  कन्या- या काळात आपण , कौटुंबिक समस्या सोडविण्यात यशस्वी व्हाल तब्येती मध्ये सुधारणा होईल नोकरी नसणार्यांना रोजगार प्राप्तीचे योग्य येतील विद्यार्थी वर्गाचे अभ्यासाकडे लक्ष लागणार नाही त्यामुळे काळजी घ्यावी महिलांनी याकाळात घरात विशेष लक्ष द्यावे घरातील वयस्कर व्यक्तींशी वादाचे प्रसंग उदभवतील त्यामुळे कुटुंबात ऐक्य टिकवण्याचा प्रयत्न करा
तूळ – नोकरीत असणाऱ्यांनी या काळात वरिष्ठांशी मतभेद करू नयेत त्याचे परिणाम पुढील काळात आपणास वाईट होण्याचा संभव आहे नवीन मित्र भेटतील मुलां विषयी एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे स्थावर प्रॉपर्टी विषयी गुंतवणूक फायदेशीर राहील महिला वर्ग खरेदीचा आनंद घेतील घरघुती समस्यां वर तोडगा  निघेल
वृश्चिक – हा आठवडा आपणास अनुकूल असं राहील आपल्या स्वतःच्या बुद्धी कौशल्याने एखादे यश संपादन कराल त्याचा अभिमान राहील नोकरी व्यवसायात असणाऱ्या व्यक्तीचे कामाच्या ठिकाणी वातावरण प्रसन्न राहील त्यामुळे कामाचा उरक वाढेल. सरकारी कामासाठी यश दायी सप्ताह राहील महिला वर्गाला कौटुंबिक वातावरण उत्साही राहील नोकरीत असणाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल.
धनु – मागे केलेल्या कष्टाचे फळ या आठवड्यात मिळेल तसेच या आठवड्यात वाहन जरा जपून चालवावे नाही तर अपघाताचे योग येऊ शकतील मुलांची चिंता राहील नोकरी व्यवसाय असणाऱ्यांचा व्यवसाय सामान्य राहील महिलांनी कुटुंबातील वडील धाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी . विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये या काळात चिडचिड वाढेल
 मकर – मागील आठवड्या पेक्षा हा आठवडा उत्तम फलप्रद राहील गोचरीने ग्रहांचे परिवर्तन आपणास अनुकूल राहील त्यामुळे अति असलेल्या कामातले अडथळे दूर होतील कामे मार्गी लागतील आत्मविश्वास वाढेल त्यामुळे पराक्रम दाखवाल भाग्याची साथ लाभेल ईश्वर चिंतनाने अजून फायदा होईल नवीन योजना आखल्या जातील महिलांना खरेदीचे योग्य येतील
कुंभ- हा आठवडा आपणास मध्यम फलदायी राहील अंगात उत्साह वाढेल त्यामुळे तुम्ही मेहनतीने काम कराल परंतु कामात अडथळे येतील त्यामुळे तुम्ही निराश व्हाल अधिक प्रमाणात खर्च झाल्याने आर्थिक बाजू कमकुवत होईल हा आठवडा वाहनाच्या दृष्टीने प्रतिकूल राहील महिलांनी या काळात खर्चावर नियंत्रण ठेवावे नाहीतर जमा खर्चाचा ताळमेळ कोलमडेल
मीन – या काळात काही तरी वेगळे करून दाखविण्याची संधी प्राप्त होईल त्यामुळे आत्मविश्वास वाढेल अडलेली कामे मार्गी लागतील खाद्य व्यवसायात असणाऱ्यांना लाभ होईल एखाद्या ठिकाणचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. विद्यार्थी वर्गाला अनुकूल असा काळ राहील छोटे प्रवासाचे योग येतील आलेल्या संधीचे सोने कराल .
 ज्योतिषी उषा सुभेदार 
पद्मम्बा , कोरे गल्ली शहापूर बेळगाव 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.