राज्य परिवहन मंडळाच्या बस मधूनच प्रवास करावा या साठी दर महिन्याच्या 20 तारखेला शासकीय कर्मचाऱ्यांनी बस मधून प्रवास करून जनतेला वेगळा संदेश दिला जात आहे.
शनिवारी बेळगावातील पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी बस मधून प्रवास करत बस डे साजरा केला.
पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांच्यासह पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, ए सी पी शंकर मारिहाळ आणि अन्य के एस आर टी सी च्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालया पासून बस स्थानका पर्यंत बस मधून प्रवास केला बस स्थानकावर जाऊन प्रवास केला बस स्थानकांवर राज्य परिवहन मंडळाची बसचा वापर केल्यामुळं प्रवाश्यांच गुलाब पुष्प देऊन आभार मानले सरकारी बस चा वापर करा असे आवाहन देखील केलं