माणसाच्या जीवनातील अखरेचा टप्पा मुत्यु,या टप्प्यावर आल्यावर पुढील प्रवासासाठी ज्या ठिकाणी जावं लागत ते ठिकाण नीटनेटके असावं हा सर्वसामान्य प्रघात पण काही स्मशानभूमीत अस्वच्छता वाढलेली झाडेझुडपे पाण्याचाअभावं बसण्याची गैरसोय अशा अनेक अडचणी असतात. अश्याच चवाट गल्लीच्या स्मशानभूमीची स्वच्छता गल्लीतील युवक कार्यकर्त्यांनी केली आहे.
चव्हाट गल्लीतील सर्व युवक एक जुटीने एक दिलाने या स्वच्छताअभियानात सहभागी झाले होते. पिण्याच्या पाण्याची, शेडसह बैठक व्यवस्था, विद्युत दहिनी,उपलब्ध करा तसेच कोल्हापूर प्रमाणे बेळगाव महानगरपालिका तर्फे संपूर्ण अंत्य विधीची सोय उपलब्ध करून द्यावी स्मशान भूमीत केवळ दहणाची सोय न करता बाकी अनेक इतर सोयी देखील करण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.
चवाट गल्लीच्या समस्त नागरिकानी एक निधी संकलीत करून त्या पैशाच्या व्याजातून गल्लीतील नागरिकांसाठी मोफत अंत्यविधी उपलब्ध करण्याचा मानस देखील पुढे येत आहे.