रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाउन तर्फे विजय मोरे यांच्या शातांई वृध्दाश्रमाच्या शांताई विद्या आधार उपक्रमाच्या रद्दीतून बुध्दी या उपक्रमांतर्गत सेंट मेरीच्या इंटरअक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने घरातील भरपूर रद्दी एकत्र करुन ती शांताई वृध्दाश्रमाचे अध्यक्ष विजय मोरे यांच्याकडे गुरुवारी रोजी एका छोट्याशा समारंभात सुपुर्द केली.
विजय मोरेंनी विद्यार्थ्यांचे व शाळेतील साऱ्या शिक्षक वर्गाचे आणि प्राचार्या जास्मिन रुबडी, तसेच मुख्याध्यापक पी पी अल्वारीस,शिक्षक ,आशा चव्हाण,मंगल पाटील व इतरांचे कौतुक केले व आभार मानले.गेली दोन वर्षे या शाळेतील विद्यार्थी ही योजना राबविताहेत.
विजय मोरेनी अशा रद्दीतून आजपर्यंत 340 हून अधिक गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर 16 लाखाहून अधिक पैसा उभा करुन खर्च केल्याचे सांगितले.रोटरी क्लबचे सेक्रेटरी सतीश नाईकनी विद्यार्थाय्ंचे कौतुक केले व रोटरीच्या अशा कार्यक्रमात भाग घेण्याचे आवाहन केले.
काकडे फौंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडेनी स्वतः साठी जगलात तर मेलात दुसऱ्यासाठी मेलात तर जगलात हा संदेश देत वाचन संस्कृती वाढवा व सामाजिक कामात भाग घ्या असा संदेश दिला.इंटरअक्टचे शाळेचे प्रभारी युवराज नायक,विद्यार्थी प्रतिनिधी अध्यक्ष प्रदीप भंडारी,सेक्रेटरी प्रेक्षा पावले,सानिका,स्याम व ईतरांनी सहयोग दिला.एक टेम्पो भरुन रद्दी यावेळी देण्यात आली.राष्ट्र गीताने सांगता झाली.