Saturday, December 21, 2024

/

जन्मजात अंध पण बुद्धीने सुपर कॉम्पुटर

 belgaum

अथणी येथील २३ वर्षाचा बसवराज उमराणी हा तरुण म्हणजे एक कमालच आहे. जन्मजात अंध पण बुद्धीने सुपर कॉम्पुटर असलेल्या या तरुणाकडे गणिताचे असामान्य ज्ञान आहे. त्याचे अंधत्व या कौशल्याच्या आड कधीच येत नाही. प्रचंड स्मरणशक्तीचे वरदानही त्याला लाभले आहे.

basavraj-umrani-
एक महत्वाचा अवयव हिरावून घेतलेल्या देवाने त्याला प्रचंड बुद्धिमत्ता दिली आहे. १०००१ मोबाईल क्रमांक आठवण ठेवल्याबद्दल बसवराज गिनीज रेकॉर्ड चा मानकरी ठरला आहे. १०० वर्षाचे कॅलेंडर तो सांगू शकतो आणि एक सेकंदात मोठ मोठ्या दहा आकड्यांची बेरीज आणि इतर क्रिया करू शकतो.८ वर्षाचा असताना त्याला आपल्यातील या गुणांची ओळख झाली.
तो आपले पालक व लहान भावासमवेत राहतो, आपले कुटुंब तो नोकरी करून सांभाळतो, त्याने बीएड केले आहे त्याला गणितात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे, शकुंतला देवी यांना तो आपली प्रेरणा मानतो.
आपल्याला डोळे असते तर इतके गणिती ज्ञान येऊ शकले नसते असे त्याला वाटते.आपण हे अपंगत्व मानत नाही उलट एकाग्रतेसाठी मदत होते असे त्याने बेळगाव live शी बोलताना सांगितले.
१९०० ते २०१७ या वर्षातील कोणत्याही तारखेला कोणता दिवस होता ते तो अचूक सांगू शकतो, तो एक चालतं बोलतं घड्याळ आहे, दिवसाच्या कोणत्याही वेळी तो किती वाजले ते सांगू शकतो. फक्त स्पर्शाने नोटेची किंमत तो सांगतो.
मनात गणित करून अचूक उत्तर देतो, कॉन्टॅक्ट नंबर त्याला पाठ आहेत, तो क्रिकेटचा चाहता आहे, क्रिकेटर चे सारे रेकॉर्ड त्याला आठवणीत राहतात.
बसवराज हा सर्वांसाठीच प्रेरणादायक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.