२६ जानेवारी नंतर बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात सुरु करण्यात येणाऱ्या हेल्मेट सक्तीला बेळगावातून हळू हळू विरोध व्हायला सुरु झाला आहे. बेळगाव शहरात स्मार्ट सिटी आणि रस्ता रुंदीकरणाची अनेक कामे सुरु आहेत स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होई पर्यंत हेल्मेट सक्तीची लागू करू नये अशी मागणी वकिलांनी केली आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी एस जिया उल्ला याना दिलेल्या निवेदनात वकिलांनीसध्या हेल्मेट सक्ती करू नये अशी मागणी केली आहे . स्मार्ट सिटी रस्ता रुंदीकरणा मुळे शहरातील सिग्नल व्यवस्थित कार्य करत नाही आहेत जातीय दंगलीत वाहन आगी लावण्यात ,महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीत हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकी स्वरांचा समावेश आढळून आला आहे अश्या स्थितीत हेल्मेट सक्ती करणे कितपत योग्य असा प्रश्न देखील वकिलांनी उपस्थित केला आहे
यावेळी वकील अण्णासाहेब घोरपडे दिवटे रवी बोगार आदी उपस्थित होते .