कौशल्य राज्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी भडकाऊ भाषण देणं बंद करून आपल्या लोकसभा क्षेत्रात लक्ष द्यावं असा सल्ला अवजड उद्योग मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी व्यक्त केला आहे
बेळगावातील ए एम शेख शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रमाच उदघाटन करून सहभागी झाल्यावर ते बोलत होते. राज्यात आणि त्यातल्या त्यात बेळगावात शिक्षण क्षेत्रात अल्पसंख्यांक समाजाच्या शिक्षण संस्थांचे योगदान मोलाचे आहे असे
देशपांडे यांनी म्हटलं आहे
राज्यात वैधकीय क्षेत्रास मागणी वाढली आहे विविध संशोधन झाल्याने हा भाग वैधकीय क्षेत्रात पुढे आहे . लवकरच राज्य सरकार राज्यातील प्रत्येक तालुक्यात आयुष क्लिनिक आणि हॉस्पिटल सुरू करणार आहे राज्यातील जनतेला उत्तम शिक्षण आरोग्य आणि आहार पुरवण्यास सरकार कटिबद्ध आहे असे देखील ते म्हणाले. गेल्या ५० वर्षात शेख शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिल आहे त्याचा बेळगावला फायदा झाला आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं .