वडगाव भागातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये लक्ष्मी नगर भागाला मूलभूत सुविधा पुरवा अशी मागणी करत भाजप नेते पांडुरंग धोत्रे यांच्या नेतृत्वात लक्ष्मी नगर येथील रहिवाश्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन केली.
या भागात स्वच्छते अभावी दुर्गंधी पसरली असून रोग राई वाढली आहे शहर एकीकडे स्मार्ट होत असतांना मध्यम वर्गीय वस्ती असलेला हा भाग अविकसित राहिला आहे पालिका प्रशासनाने अनेक मागणी करून देखील दुर्लक्ष केलं आहे . देवांग रस्त्याचे गेल्या १५वर्षा पासून डामरीकरणं झालेले नाही अनेक कूपनलिका असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही अनेक ठिकाणी गटार सुद्धा नाही मूलभूत सुविधा पासून हा परिसर वंचित आहे याचा लवकर विकास करा अशी मागणी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला याना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
लवकरच पहा पालिकेस सूचना देऊन या भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन एस जिया उल्ला यांनी लक्ष्मी नगर येथील आंदोलकांना दिल आहे. यावेळी आर एकबोटे, यल्लापा तिगडी ,भोजाप्पा हजेरी मौलेश कांबळे प्रेम हजेरी आदी उपस्थित होते