येथील पत्रकार विकास अकादमीतर्फे बेळगावमध्ये आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे आणि साहित्यिक गुणवंत पाटील यांच्याहस्ते मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस हार वाहण्यात आला.
सार्वजनीक वाचनालयाने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा सत्कार झाला.
सेक्रेटरी प्रसाद प्रभू यांनी सुत्रसंचलन केले व आभार मानले.
पत्रकार डी के पाटील, रवी नाईक, कुंतीनाथ कलमनी, उपाध्यक्ष वैजनाथ पाटील, एम डी मुल्ला, रमेश हिरेमठ, श्रीकांत काकतीकर, जगदीश दड्डीकर, प्रसाद पाटील व इतर सहभागी झाले होते.