बेळगाव live च्या माध्यमातून झालेल्या कार्याची पोचपावती म्हणून बेळगावातील सर्वात जुनी आणि नामांकित संस्था सार्वजनिक वाचनालयाने दिली आहे. बेळगाव live ला यंदाचा सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कार हा मराठी विभागासाठीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गुरुवार दि १८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गोगटे रंगमंदिर येथे वाचनालयाच्या बॅ नाथ पै व्याख्यानमालेचे उदघाटन होणार आहे. यावेळी उदघाटक ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
५००० रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, बेळगाव live ची दखल घेऊन दिलेल्या या पुरस्काराबद्दल शतशः आभारी आहोत.
*बेळगाव live ने वर्षभरात काय काय केले*
#मराठा क्रांती मोर्चा चे सगळे अपडेट्स
#महापौर निवडणुकीत मराठी महापौर व्हावा यासाठी कव्हरेज
#दिल्ली सुप्रीम कोर्टात सुनावणी साठी कव्हरेज…दिल्ली दौरा …
#मूक शांततेत काळ्या दिनाच्या सायकल फेरीसाठी विशेष मोहीम
ना घोडा ना गाडी .मूक सायकल फेरीची मोहीम ..
#काळा दिनाचे दिवशीचे क्षणा क्षणाचे अपडेट…
#पद्मश्री सरकारी वकील उज्वल निकम बेळगाव दौरा कव्हरेज…
#कर्नाटक अधिवेशन विरोधात समितीच्या मेळाव्याचं संपूर्ण दिवसभर कव्हरेज …
#अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन कव्हरेज…
शहरातील ताज्या बातम्या त्याच दिवशी आणि लवकरात लवकर पोचवित नागरिकांना सतत अपडेट ठेवले
#आठवड्याचे व्यक्तिमत्व विशेष सदर लोकप्रिय झाले त्यात सामाजिक कार्यात कार्यरत व्यक्तींना आवाज मिळवून दिला #विशेष स्थानिक राजकीय विश्लेषण, भाकीत
#अनेक विध्यार्थी खेळाडूंना शैक्षणिक मदत मिळवून देण्यात बेळगाव live चा पुढाकार आहे.
याची दखल बेळगाव कर जनता तसेच सार्वजनिक वाचनालय सारख्या संस्थेने घेत पत्रकारितेतला पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे..
त्यांचे आभार. हा पुरस्कार उत्साह आणि मनोबल वाढविणारा असेल. सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मधल्या कार्याची दखल आहे. हे यश केवळ प्रकाश बेळगोजी यांचं नसून बेळगाव live ला प्रत्यक्ष रित्या अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्या बेळगावातील वरिष्ठ पत्रकारांचं आणि मित्र शुभ चिंतकांच देखील आहे.
भविष्यात अन्यायावर आवाज उठवणे, शोषितां साठी काम करणे यासाठी बेळगाव live कटिबद्ध राहील.
जबाबदारी आणखी वाढली आहे.
धन्यवाद!