शिवा काशीद,तानाजी मालुसरे,बाजीप्रभू देशपांडे,मोरारबाजी यांच्या बलीदान त्यागाने स्वराज्य उभारता आल तसाच त्याग सीमा लढ्यात देखील आहे. स्वार्थांनी पछाडलेल्या लोकांना त्यागाच काहीही लेन देन नसत म्हणून या लडबडलेल्या लोकांना बाजूला ठेवा,त्यामुळे सगळे एक झालो तर निवडणूक जिंकू शकतो असे मत शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी व्यक्त केले.
सोमवारी सायंकाळी लोकमान्य रंग मंदिरात आयोजित’सीमा बांधवानो जागे व्हा’ या पुस्तिकेचे अनावरण केल्यावर ते बोलत होते. यावेळी महापौर संज्योत बांदेकर,रेणू किल्लेकर,टी के पाटील,पंढरी परब,किरण गावडे,जयंत मंत्री, जगदीश कुंटे उपस्थित होते.
सीमा प्रश्नाची लढाई त्यागाची लढाई आहे तुमचे स्वार्थ बाजूला ठेवला तर आम्ही जिंकू अन्यथा हार नक्की आहे पराभवाचे चटके सीमा वासियांनी खाल्लेले आहेत.दोन वेळा उपमहापौर एकदा महापौर पद भोगलेला स्वार्थाने राष्ट्रीय पक्षात कुत्र्या सारख गेलाय त्याला लाज नाही का वाटली? बेळगावात आज मराठी लोकसंख्या कमी होत चालली आहे तिबेट मध्ये जसे तिबेटीयन लोक अल्पसंख्याक झालेत तशी स्थिती मराठी भाषिकांची आहे एकेकाळी सात मतदार संघ होते आता केवळ चारच उरलेत त्यामुळे एकी शिवाय पर्याय नाही असेही ते म्हणाले.
निवडणूक आली की काही जन बाशिंग बांधून तयार होतात अनेकदा पराभव झाला तरी मीच बसतो असे म्हणतात यांच्याशिवाय दुसर कोण नाही का? जास्त भांडण असतील तर सर्व उमेद्वाऱ्या महिलांचं ध्या, महिला या प्रामाणिक पणे काम करणाऱ्या असतात. लोक आमच्या बरोबर आहेत ज्याची निवडून येण्याची पात्रता आहे त्यालाच पुढे करू अस देखील त्यांनी स्पष्ट केल.
सुरुवातीला सीमा लढ्याची माहिती युवकांना पोचावी त्यामुळे तरुणांना प्रेरणा देणारी एका बैठकीत वाचून होणार अस आकार लहान असलेल पुस्तकात सीमा प्रश्नाच्या जनजागृती साठी काढण्यात आल असल्याच कुंटे यांनी स्पष्ट केल. सीमा भागातील प्रत्येक घरात हे पुस्तक पोहोचल पाहिजे त्यासाठी सावरणं कामाला लागा असे आवाहन रेणू किल्लेकर यांनी केल.सीमा प्रश्न तनमनात बेळगावात रुजू घातला असून आजच्या युवा पिढीला जाणीव करून देण्यासाठी हे पुस्तक आहे. हे पुस्तक न समजता ज्वलंत प्रश्नच समजून बेळगावातल्या प्रत्येक पोचवूया अस महापौर संज्योत बांदेकर म्हणाल्या. यावेळी बेळगावातील समिती कार्यकर्ते आजीमाजी लोक प्रतिनिधी उपस्थित होते.