हुतात्मा दिनाच्या आयोजनासाठी आयोजित केलेल्या शहर समितीच्या बैठकीत अनेक युवा कार्यकर्त्यांनी नेत्यांना धारेवर प्रश्न विचारले आहेत. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी माजी महापौर मालोजी अष्टेकर होते तर व्यासपीठावर प्रकाश मरगाळे आणि रणजीत चव्हाण पाटील देखील उपस्थित होते. सुरुवातील मदन बामणे यांनी मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांनी बैठक बोलावून का गैरहजर आहेत त्यांना गांभीर्य नाही आहे का असा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी प्रकाश मरगाळे यांनी ते सीमा प्रश्नांच्या कामासाठी कोल्हापूरला गेले असल्याचे स्पष्टीकरण दिले.
शहर समिती खिळखिळी असताना बळकट करायची सोडून शहरातील नेते मंडळी ग्रामीण भागातल्या कार्यक्रमातील व्यासपीठावर अधिक दिसतात असा प्रश्न विचारत श्रीकांत कदम या युवकाने विचारत शहर समिती नेत्यांना धारेवर धरले. याशिवाय पाच वर्षांत 1 नोव्हेंबर आणि 17 जानेवारी सोडून बैठका का घेतल्या जात नाहीत आणि युवकांना कोणताही ठोस कार्यक्रम का दिला जात नाही? तसेच 2013 साली कै. सुरेश हुंदरे साहेबांच्या उपस्थितीत शहर समितीची सर्वसमावेशक निवड करण्यात आली होती पण त्यानंतर व्यापक बैठक कां आयोजित करण्यात आल्या नाहीत? हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे असा विचार कार्यकर्त्यांनी मांडले .त्यावर अष्टेकरानी अध्यक्ष येताच त्यांच्याशी चर्चा करून कळवू असे उत्तर दिले.
एकास एक उमेदवार दिला तरच समितीच्या जागा निवडून येणार अशी परिस्थिती आहे समितीला पूरक अस वातावरण असताना दोन दोन उमेदवार बसले तर कदापि एकही निवडणूक येणारनाही याचा विचार व्हावा निवडणुका म्हणजे रियालटी शो नको यात सर्वसमावेशक उमेदवार असावा तो सर्वमान्य असावा असही मुद्दे देखील युवकांनी उपस्थित केले.