बेळगाव सीमाप्रश्नी योगदान दिलेले समाजवादी नेते बॅ नाथ पै चौकाची स्वच्छता मोहीम विविध संघटना मंडळाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. शहर स्मार्ट करण्यासाठी शहरातील अनेक चौकांचे सुशोभीकरण पालिके तर्फे हाती घेण्यात आले आहे मात्र शहरातील दक्षिण भागातला एक महत्वाचा असणारा बॅ नाथ पै चौकाकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं यासाठी या चौकाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी मराठी युवा मंच,येळ्ळूरवेस चर्मकार संघटना,महा गणपती सुधारणा मंडळ लक्ष्मी गल्ली, नाथ पै चौक गणेश मंडळ व्यापारी वर्ग यांच्या वतीने स्वच्छता करण्यात येत आहे. नाथ पै चौकाचे सुशोभिकरण करून या ठिकाणी नाथ पै यांचा उभा पुतळा स्थापन करा अशी मागणी करण्यात आली आहे.
हा चौक सुशोभिकरण करण्यासाठी पुढील महा पालिकेच्या बैठकीत ठराव घेऊन दहा लाखाहून अधिक निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन माजी महापौर किरण सायनाक यांनी दिले आहे. यावेळी शिव प्रतिष्ठानचे किरण गावडे, मराठी युवा मंच चे नारायण किटवाडकर, सतीश गावडोजी,गजानन धामणेकर, नगरसेवक रतन मासेकर, दिनेश रावळ, सुधीर कालकुन्द्रीकर,संजय पाटील, द्वारकनाथ ओरणकर आदी उपस्थित होते.