शिव प्रतिष्ठान संघटनेचे संभाजीराव भिडे(गुरुजी) यांच्या बेळगावातील नियोजित सभेला बेळगाव पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. उद्या रविवारी सायंकाळी शहरातील संभाजी उद्यानात भिडे यांची जाहीर सभा होणार होती त्या जाहीर सभेस बेळगाव पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच कारण देऊन परवानगी नाकारली आहे.जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी भिडे गुरुजी यांना बेळगाव जिल्हा बंदीचा आदेश काढला आहे भीमा कोरेगाव घटनेच्या पाश्वभूमीवर काहो दलित संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भिडे यांना प्रवेश बंदी करा अशी मागणी केली होती
रायगड येथे सुवर्ण सिंहासन बसवण्याच्या आणि २६ जानेवारी ३० जानेवारी दरम्यान प्रतापगड ते श्री रायरेश्वर पर्यंत मोहीम संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी संभाजी उद्यानात जाहीर सभेच आयोजन करण्यात आल होत त्यासाठी मार्केट पोलीसा कडून रीतसर परवानगी देखील मागण्यात आली होती मात्र पोलिसांनी गेल्या दोन दिवसापूर्वी शहरात दलित संघटनेच्या मोर्चाच्या पाश्वभूमीवर झालेली दगडफेक अन त्यांनतर झालेली तणावाची स्थिती या घटनांचा विचार करत कायदा आणि सुव्यवस्थेच निमित देत भिडे गुरुजींची सभा पुढे ढकला अस पत्र शिवप्रतिष्ठानला दिल आहे.
भिडे गुरुजींची सभा बेळगावात कधी घायची याबाबत शिव प्रतिष्ठानची बैठक सुरु असून पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे या बाबत बैठकीत निर्णय घेणार असल्याची माहिती शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे यांनी बेळगाव live कडे बोलताना दिली आहे.
शेती मालालायोग्य हमी भाव व रेशन दुकान मध्ये कमी किमतीत पशु खाध्य व जनावर घेण्यासाठी कमी किमतीत लोण किंवा सबसिडी द्या