युवावर्गात सीमाप्रश्नी जागृती निर्माण करण्याच्या हेतूने बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने ‘ सीमाबांधवांनो जागे व्हा !’ ही पुस्तिका बनविली आहे. हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि १५ रोजी सायंकाळी ६ वाजता कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर ( रिझ टॉकीज ) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. सीमाप्रश्नी नवीन पिढीत जागृती हा मुख्य उद्देश असून समस्त सीमाभागातील युवावर्ग, समिती नेते, कार्यकर्ते तसेच आजी माजी लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरचिटणीस किरण गावडे यांनी केले आहे.