देशात शेतकऱ्यांच्या सबली कारणासाठी स्वतंत्र योजना आवश्यक आहे असे मत केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी बेळगावात बोलताना व्यक्त केले आहे . के एल ई येथील जिरगे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय कृषक समाजाच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी सभागृहात खासदार प्रह्लाद जोशी ,खासदार सुरेश अंगडी,राज्यसभा सदस्य डॉ प्रभाकर कोरे ,कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष किसनबीर चौधरी, राज्याध्यक्ष लिंगराज पाटील उपस्थित होते.
देशात पुन्हा एकदा हरित क्रांती झाली तरी कृषी क्षेत्रात शेतकरी आर्थिक दृष्टया बळकट होणार नाहीत अशी खंत व्यक्त करून शेतकऱ्यांना सक्षम सदृश बनवण्या करीत राष्ट्रीय योजनेची नितांत आवश्यकता असल्याचे सिंह म्हणाले. २००३ च्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्री मंडळात मी कृषी मंत्री असताना शेकडा ४ टक्के व्याज दराने कर्जाची सुविधा मिळून देण्याची सोया करून कृषी आयोगाची रचना केली असल्याची त्यांनी यावेळी आठवण करून दिली. २१ व्या शतकात भारत कृषी क्षेत्रात विकसित होणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला .
माझे आई वडील शेतकरी असल्याने मी शेती करतच कृषी मंत्री व आता गृह मंत्री बनलो आहे . कर्नाटकात जे डी एस भाजपचे संमिश्र सरकार असताना अर्थमंत्री म्हणून काम केलेल्या येडीयुराप्पा यांनी शेतकऱ्यांचे शेती कर्ज माफ करण्याची सूचना केली असता ते कर्ज माफ केलं असल्याची देखील त्यांनी आठवण करून दिली.
म्हादई नदी वादावर बोला अशी केली मागणी
म्हादई नदीच्या कळसा भांडुरा नाल्याच्या पाण्या बाबत आपण आपले विचार व्यक्त करावेत अशी मागणी मेळाव्यास उपस्थित शेतकऱ्यांनी केली मात्र राजनाथ सिंह यावर काहीच बोलले नाहीत.देशात लहान मोठे व्यापारी श्रीमंत बनले परंतु आजतागायत शेतकरी श्रीमंत बनला नसल्याची खंत खासदार सुरेश अंगडी यांनी व्यक्त करून शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असल्याचे ते म्हणाले.